गंडकी
गंडकी : हल्लीची गंडक–गंगेची हिमालयातून येणारी एक प्रमुख उपनदी. लांबी काली गंडकसह सु. ६७५ किमी, जलवाहनक्षेत्र सु. ४५,८०० चौ. किमी.; त्यापैकी भारतात ९,५४० चौ. किमी. मध्य हिमालयात, दक्षिण तिबेटात, ७,६०० मी. उंचीवर उगम पावून नेपाळात काठमांडूच्या पश्चिमेस ८८ किमी. वर आलेल्या काली गंडकला त्रिशूला व इतर प्रवाह मिळून झालेली बडी गंडक नारायणी, त्रिशूलीगंगा किंवा सप्तगंडक म्हणून नैर्ऋत्येकडे वाहू लागते.